भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर ः शिक्षक म्हणून नोकरीस लावता असे आमिष दाखवून 20 लाख 400 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिंगार येथील सातजणांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आश्रम शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून 6 लाख रुपये घेऊन व आश्रमशाळा खांडगाव (ता.पाथर्डी) येथे शिक्षकांची नोकरी देऊन विना वेतन काम करून घेऊन पगाराचे 14 लाख 40 हजार रुपये व नोकरीसाठी घेतलेले रक्कम अशी एकूण 20 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अमोल दिनकर वांढेकर (वय 32 रा. मोहोज खुर्द ता.पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुभाष बन्सी वाळवे, अनिता सुभाष साळवे, अनिल तुळशिदास शिंदे, मंगल अनिल शिंदे, राजू बन्सी साळवे, संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे आदी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोहकॉ शेख हे करीत आहेत.
0 Comments