Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उद्योजक सय्यद यांचे खंडणीसाठी अपहरण करणारे आरोपी एलसीबीकडून जेरबंद


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - २५ लाखाच्या खडणीसाठी नगर शहरातील उद्योजक अब्दुल करीम सय्यद यांचे अपहरण करणारे चार आरोपी अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाना यश आले आहेत. वैभव विष्णू सातोनाकर (वय १९, रा.सातोनाकर गल्ली, परतूर ता.परतूर जि.जालना), निहाल उर्फ बाबा मुशर्रफ शेख (वय २०, लढ्ढा काँलनी, ता.परतूर जि.जालना) ही पकडण्यात आलेल्या आरोपीची नावे असून अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पोलीस कडून मिळालेली माहिती अशी की, अब्दुल सय्यद यांचे अपहरण घटनेतील आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजहर मंजूर शेख याने पारतूर जि.जालना येथील साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील परतूर येथील लढ्ढा काँलनी पहाटेच्या सुमारास सापळा लावून मुख्य आरोपी अजहर शेख हा राहत असणाऱ्या घरावर छापा टाकून वैभव विष्णू सातोनाकर (वय १९, रा.सातोनाकर गल्ली, परतूर ता.परतूर जि.जालना), निहाल उर्फ बाबा मुशर्रफ शेख (वय २०, लढ्ढा काँलनी, ता.परतूर जि.जालना) यांना पकडण्यात आले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडावाउडवीचे उत्तरे दिली. पोलीस खाकी दाखवताच त्यांनी गुन्हा केलीची कबुली दिली. गुन्हा हा अजहर मंजूर शेख (रा.फकीरगल्ली, अहमदनगर) , फतेह सिध्दीक अहमद अन्सारी (रा.मलंगशहा मोहल्ला, परतुर जि.जालना) यांच्या मदतीने अजहर शेख यांच्या सांगण्यावरून केला असल्याची कबुली दिली. परंतु पोलिसांची चाहुल लागताच शेख व अन्सारी ही दोन्ही आरोपी अपहरणासाठी वापरण्यात आलेली टाटा टियोगा (एम एच २०, ई जे ३८७९) हे वाहन सोडून चावी घेऊन पळून गेले. गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन परतूर पोलीस ठाण्यात जमा करून करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदिप पाटील, पोहेकाँ मन्सूर सय्यद, दत्ता हिंगडे, दत्ता गव्हाणे, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, रविंद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पोकाँ संदीप दरदंले, मेघराज कोल्हे, मच्छिंद्र बर्डे, सचिन आडबल, संदीप घोडके, चापोकाँ सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments