Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर-मनमाड महामार्ग रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा - आमदार संग्राम जगताप
नगर शहर हद्दीतील महामार्गावर अपघात झाल्यास अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करू ः आ. जगताप  
 अहमदनगर-मनमाड महामार्ग रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा ;  जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहर हद्दीतून जाणार्‍या महामार्गावर शहरातील नागरिकाचा अपघात झाल्यास त्यास जागतिक बँक प्रकल्प विभाग जबाबदार धरण्यात येईल, त्या संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा देत आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर-मनमाड महामार्ग  रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावेत, असे  पत्रही जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

 अहमदनगर-मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया यापूर्वीही पूर्ण झालेली आहे. सद्यस्थिती या महामार्गावरून प्रवास करणेही नागरिकांना जिकरीचे झालेले आहे. या महामार्ग रस्त्याचे काम करण्यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे. यापूर्वीही याबाबत जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे पाठपुरावा केला होता. शासनाकडून नगर-मनमाड महामार्ग रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. निविदा प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. यामुळे या महामार्ग रस्त्याबाबत जागतिक बँक प्रकल्प विभागामार्फत तात्काळ कामास सुरुवात करण्यात यावी, अश्या मागणीचे पत्र आमदार जगताप यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments