Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयडीबीआय बँक खात्यातील पैसे चारणारा अटक ; सायबर क्राईम विभागाची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आयडीबीआय बँकेचा सर्व्हर हँक करुन आयडीबीआय बँकेतील शहर बँकेच्या असणाऱ्या चालू खात्यातून पैसे चोरी करणाऱ्या भामट्याला अहमदनगर सायबर क्राईम विभागाने मोठ्या चाणाक्षाने पकडण्यात आले. समीम अहमद खान (वय २८, रा.प्लँट नं.१०३, सहारा सोसायटी, प्लाँट नं.३८, सेक्टर ११, तळोजा फेस नं.१, जि.रायगड, नवीमुंबई , मुळ रा.घर नं.६६ रुद्रपुर, ता.फुलबाग, हल्दी संजय काँलनी, पंतनगर, जि.उदमसिंहनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सायबर क्राईम पोलीस विभागात दाखल गुन्ह्याचा तांत्रिक दष्ट्या तपास करुन रुद्रापुर येथील आयडीबीआय अकाऊंट तसेच आयडीबीआय बँकेत असणारे शहर बँकेचे अकाऊंट आणि ज्या बँकेत पैसे गेले होते, असे अकांऊट हे वापरले होते. यावरून समीम अहमद खान याला दि.२७ आँक्टोबरला अटक केली. त्याला दि.८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कास्टडीत रिमांड घेण्यात आले आहे. त्याच्या कडून १ लाँपटाँप व ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु , अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अरुण परदेशी, पोसई प्रतिक कोळी, पोहेकाँ खेडकर, पोकाँ अभिजित अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, चापोहेकाँ शेलार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments