Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नवीन वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील ७ साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुका
आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - येत्या नवीन २०२० या वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात येणार आहे. यामुळे आता जिल्ह्यात निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० या नवीन वर्षात संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात येणारे साखर कारखाने याप्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना, संगमनेर (दि.१६ मार्च २०२०), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना, प्रवरानगर ( दि.६ मार्च २०२०), लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडा (दि.२७ मार्च २०२०), मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई ( दि.२३ मार्च २०२०), वद्धेश्वर कारखाना, पाथर्डी ( दि.२७ मार्च २०२०), अशोक कारखाना, श्रीरामपूर (दि.२० एप्रिल २०२०), सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा ( दि.२० एप्रिल २०२०), कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा ( दि.२१ एप्रिल २०२०) ही सात साखर कारखाने आहेत. ज्या त्या साखर कारखान्यांच्या क्षेत्रात निवडणूकपूर्व हालचाली सुरु झाल्या आहेत. अनेक कार्यकर्तेनी आपापल्या नेत्यांकडे कारखान्याच्या संचालकपदी निवड व्हावी, म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. सहकार क्षेत्रातील साखर कारखाना निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीवरच प्रत्येक तालुक्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकी अंवलबून असतात, त्या दष्टीने या निवडणूक महत्त्वापूर्ण मानल्या जात असल्याने आता वेध साखर कारखाना निवडणुकीचे असा सुर अहमदनगर जिल्ह्यात उमटला आहे.

Post a Comment

0 Comments