Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दीनदयाळ परिवाराच्यावतीने सुप्रिम कोर्टाच्या निकालाचे स्वागत


आयोध्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील जात व धर्मवाद संपुष्टात - वसंत लोढा
   आँनलाईन न्यूज नेटवर्क
    नगर रिपोर्टर
    अहमदनगर - राम जन्मभूमीवर मंदिर उभे करण्याचे आंदोलन सुरु झाल्यानंतर 1986 साली पंडित दीनदयाळ पतसंस्थेची इमारत असलेल्या जागेवर जिल्ह्यातील सर्वात पहिले शिलांन्यास पूजन दत्त देवस्थानचे रामकृष्ण महाराजांच्या हस्ते झाले होते. तेव्हा पासून सुरु असलेला हा वाद आता सुप्रिम कोर्टाने निकाली लावून वादग्रस्त जागेवर प्रभु रामचंद्रांचेच मंदिर उभारण्याचा दिलेला ऐतिहासिक निर्णयाने सर्व भारतीय खूष झाले आहेत. हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाच्या बाजूने निकाल दिल्याने देशातील जात व धर्मवाद संपुष्टात आला आहे. या निर्णयामुळे स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व.अटलबिहाणी वाजपेयी यांच्यासह सर्व हिंदूत्ववादी संघटनांच्या करोडो कार्यकर्त्यांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
    शनिवारी (दि.९) सकाळी सुप्रिम कोर्टाने आयोध्या येथील रामजन्म भुमीच्या जागेबाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे दीनदयाळ परिवाराच्यावतीने स्वागत करुन हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिकांना पेढे वाटण्यात आले. दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी चितळे रोड, मिरावली बाबा यंग पार्टीचे सादीक सय्यद, बाबासाहब शेख, शाकिर सय्यद यांनी एकमेकांना भरवून व मिठी मारुन आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, प्रा.सुनिल पंडित, राम धोत्रे, संजय झिंजे, महावीर कांकरिया, फिरोज सय्यद, गणेश औसरकर, रफिक शेख, आनंद लहामगे, वैभव जोशी, मुकुल गंधे, सोमनाथ चिंतामणी, प्रकाश शिंदे, राहिम सय्यद, निसार शेख आदिंसह नागरिक उपस्थित होते.

     सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय मुस्लिम समाजानेही मान्य केला असून, मुस्लिम समाजाच्या मस्ज़िदीसाठी पाच एकर एवढीमोठी जागा दिल्याने त्या ठिकाणी लवकरच भव्य मस्ज़िद उभी राहील. अशा प्रतिक्रिया मिरावली यंग पार्टीचे सादीक सय्यद यांनी यावेळी व्यक्त केल्या

Post a Comment

0 Comments