Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वांगी बुद्रुक बंधाऱ्याचे कठाडे तुटल्याने रस्ता धोकादायक ; दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
राहुरी - श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांना जोडणारा पूर्वभागातील वांगी बुद्रुक बंधारा यावरून सर्व नागरिकांचे येणे-जाणे आहे. परंतु या बंधाऱ्याचे पाच ते सहा वर्षांपूर्वी प्रवरा नदीला पूर आल्याने संरक्षण लोखंडी कठाडे पाण्याने वाहून गेले आहेत. ही कठाडे बसविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार कागदोपत्री व तोंडी पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याच बंदरावरून जाणारे-येणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. याच कारणाने स्थानिक व प्रवासी वर्गाचा रोष पहावयास मिळत आहे एरीगेशन विभागाने लवकरात लवकर या बंधाऱ्याची कठाडे बसवून दोन्ही साईटने फुटलेला रस्ता याची भर घालून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक रावसाहेब पाटील माने, सरपंच जगन्नाथ बिडगर, उपसरपंच धनंजय माने, माजी सरपंच संजय भिसे, केशव विटनोर, ग्रामपंचायत सदस्य दीपक पवार, रामभाऊ बर्डे, अण्णासाहेब कांबळे, पत्रकार कानिफनाथ पवार, विलास गिते, सोपान कोळेकर, आसाराम बिडगर, पवार, केरू येळे, बाळू कदम, नारायण चोरमले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments