Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सा.बां. अधीक्षक अभियंता कार्यालयात राष्ट्रवादीचा ठिय्या


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  दिल्लीगेट निलक्रंती चौक रस्ता दुरुस्ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी करीत, आमदार संग्राम जगताप यांनी  शुक्रवारी (दि.8) सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी बुटांचा हार टेबलवर ठेऊन केला बांधकाम विभागाचा निषेध केला.  यावेळी नगरसेवक कुमार वाकळे, यावेळी नगरसेवक कुमार वाकळे, दगडूमामा पवार, निलेश बांगरे, गुड्डू खता, राहुल बोरुडे, दिलदारसिंग बिर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  नगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक अत्यंत खराब झाला आहे. नगरकरांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. सर्वच राजकारण्यांवर विषय झालेला होता. याआधी सुद्धा आमदार संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाला पत्र देऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने अद्यापही या रस्त्याचे काम सुरू केले नसल्याने शुक्रवार (दि.8) सकाळी आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले, तर संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या निषेधार्थ बुटांचा हार घेऊन अधीक्षक अभियंता यांच्या टेबलावर ठेवला. शनिवारी (उद्या) सकाळी काम चालू करण्याचे लेखी पत्र घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी आपले आंदोलन थांबवलं.
      

Post a Comment

0 Comments