Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुजाभाव न करता सरसकट शेतजमिनीचे पंचनामे करा:आ.निलेश लंके


आमदार निलेश लंकेनी घेतली नगर तहसिल येथे सर्व विभाग प्रमुखांची  बैठक
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पारनेर - अहमदनगर जिल्हयात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे आतोनात नुसकान झाले आहे. त्यांना त्वरीत शासकिय मदत देणयाच्या दृष्टिकोणातुन नगर- पारनेरचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी आज गुरुवार दिनांक 7 रोजी तहसिल कार्यालय सभागृहात दुपारी  नगर तालुक्यातील सर्व विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक  घेतली. यावेळी तहसिलदार उमेश पाटील, पंचायत समिती माजी सभापती अशोक झरेकर, सचिन पठारे,गणेश साळवे,किशोर ठुबे,अविनाश जाधव व अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकारी यांना सुचना केल्या कि,  जास्त  पाउस झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन , तेव्हा कोणताही दुजाभाव न करता सरसकट शेतजमिनीचे पंचनामे करा. काही अडचण आल्यास मला सांगा मी प्रत्यक्ष त्याठिकाणी येवुन आपणास मदत करेल. आपण सर्व मिळुन एक कुटुंबाप्रमाणे जनतेची सेवा करु. त्याचबरोबर तहसिल कार्यालयातील महत्वाच्या टेबल वरती कामकाज करणा-या कर्मचा-यांनी जनतेची कामे वेळेत करावीत अशा सुचना दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ अधिकाधिक गोर- गरीबांना देणे कामीही सुचना केल्या. व पारनेरला दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेणार असुन नगर तालुक्यातही जनता दरबाराबाबत लवकरच तारीख घोषीत करुन यामधे जनतेचा अडचणी सोडविणार असल्याबाबत आ.लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments