Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महामार्गावर वाहनचालकांना लुटणारे दोघे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना आडवून मारहाण करीत लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. भाऊसाहेब उत्तम महारनवर (वय ३०, रा.पाटेगाव ता.कर्जत) व अनिल नामदेव माने ( वय २४, रा.माही जळगाव ता.कर्जत) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर-सोलापूर रस्त्याने सांगोला येथे द्राक्ष आणण्यासाठी जात असताना पाटेवाडी शिवारात ट्रक (नं. डब्ल्यू बी ११ डी ३६७४) पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला थांबले असता, चार अनोळखींनी चाकूचा धाक दाखवून व गाडीच्या काचा फोडून रोख रक्कम, मोबाईल, पँनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड असा ६,७०० रुपये बळजबरीने चोरून नेल्याची फिर्याद सद्दाम सलिम शेख (रा.जयनगर, पो.मकतपूर, जि.कोडरमा, झारखंड) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिली होती. हा गुन्हा भाऊसाहेब महारनवर याने व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती एलसीबीचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळाली होती, त्यानुसार पवार यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि शिरीषकुमार देशमुख, सफौ.सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ बबन मखरे, दत्ता हिंगडे, पोनि संदीप पाटील, रविंद्र कर्डिले, योगेश सातपुते, रवि सोनटक्के, सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments