Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आव्हाणे बु विठ्ठल रुख्मिणी मंदीराची दानपेटी चोरट्यांनी फोडली, ५० हजारासह सोन्या-चांदीचे दागिने चोरी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव :- आव्हाणे बु (ता.शेवगाव)येथील मध्यवस्तीतील विठ्ठल रुख्मिणी मंदीराचा लोखंडी दरवाजा कटावणीने उचकटून आतील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली आहे.आज बुधवारी( ता.६) रोजी झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दानपेटी एक वर्षापासून फोडलेली नसल्याने त्यामध्ये जवळपास ५०हजार रुपयांची रक्कम व सोनेचांदीचे तितक्याच किमतीचे दागिने असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

           याबाबत समजलेली हकीकत अशी की,आव्हाणे बु येथील बाजारतळावर असलेल्या विठ्ठल रुख्मिणीच्या मंदिरात नित्यनेमाने काकड आरतीसाठी जाणारे पांडुरंग मुटकुळे, रोहीदास खैरे,परसराम मुटकुळे, नारायण रसाळ,अशोक कोळगे, बापुराव पवार आज बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मंदिरात गेले असता अज्ञात चोरट्यांनी बाहेरचा लोखंडी दरवाजा कटावणीने उचकटून आतील दानपेटी उचलून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.त्यांनी हा प्रकार सरपंच कोळगे यांना फोनवरून सांगितला.त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ तेथे जमा झाले. पोलिसांना खबर दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
        या घटनेनंतर आज सकाळी ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे गाव बंद ठेवून ग्रामसभेचे आयोजन केले.त्यावेळी घटनास्थळाच्या पाहणीसाठी आलेल्या पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले. आव्हाणे परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या देशी दारू विक्री,मटका, जुगार, बनावट मावा विक्री या अवैध धंद्याचा पाढाच यावेळी ग्रामस्थांनी वाचून दाखवला.यापूर्वी गावचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू गणपती मंदीरातील दानपेटी फोडण्यासह तागडवस्ती जिल्हा परिषद शाळेतील संगणक चोरी,आव्हाणे गावठाण हद्दीतील दिक्षित ज्वेलर्स मधील चोरी अशा अनेक धाडसी चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात अद्यापही पोलीसांना यश आले नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी करून केला. ग्रामसभेत बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, सरपंच संगिता कोळगे,
ब-हाणपुरचे सरपंच सुभाष वाणी, कचरु चोथे,रामदास कोळगे, वसंत भालेराव, मोहन कोळगे, बाळासाहेब कोळगे, अनिल खैरे, साईनाथ झाडे, सोमनाथ कळमकर, अनिल खैरे, किशोर वाणी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 संजय कोळगे (दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
 आव्हाणे परिसरातील अवैध दारुविक्रीसह अवैध धंदे बंद करावेत या मागण्यांसाठी आव्हाणे बु,आव्हाणे खुर्द, ब-हाणपुर या तिन्ही ग्रामपंचायतीनी ठराव करून मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना आठ दिवसापूर्वी दिलेले आहे.याबाबत पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष असल्याचे यावेळी दिसून आले.अनेक तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन कुटुंब उध्वस्त झाली आहेत.मद्यपींचा त्रास परिसरातून येथे माध्यमिक व इतर शिक्षणासाठी येत असलेल्या मुलींना होत असल्याने पोलिसांनी हे धंदे त्वरित बंद करावेत अन्यथा रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 कचरू चोथे (भाजपा किसान आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष)
आव्हाणे बु" परीसरात सर्वांनी एकत्र येऊन घेतलेला अवैध धंदे बंदचा निर्णय गावांसाठी हितकारक असुन मात्र मंदीरांतील दानपेट्या चोरीस गेलेल्या असुन शेवगाव पोलीस स्टेशनचे रामराव ढिकले यांनी लवकरात लवकर तपास करून आरोपीला अटक करावी भुरट्या चोरांच्या वेळीच मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली असल्याचे  चोथे यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments