Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शालेय व महाविद्यालयीन शुल्क माफ करण्याची मागणी


नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची शासन दरबारी मागणी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 श्रीगोंदे - अवकाळी पावसाने संपुर्ण महाराष्ट्रासह श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची शासनाने फी माफ करावी यासाठी  शेतकऱ्यांच्या मुलांनी बुधवारी श्रीगोंदे तहसीलदार यांना प्रमोद म्हस्के व शिवव्याख्याते प्रा.कानिफनाथ उगले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.राज्यासह श्रीगोंदे तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 तसेच खरीप हंगामातील कापूस,मका,तूर,ज्वारी,बाजरी,कांदा,या प्रमुख पिकांसह कडधान्याचे पिक उध्वस्त झाले आहे.या बरोबरच बागायती पिके,फळबागा आणि फुलशेतीसह भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे कधीही भरुन न येणारे असे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे.त्यातच तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मुलांना शालेय,महाविद्यालयीन तसेच विविध उच्च शिक्षण,व्यावसायीक शिक्षण यासाठी तालुक्यात व शहरात जावे लागते त्यामुळे तालुक्यात व बाहेरगावी शिक्षण घेणार्‍या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या अनेक मुलांसमोर त्यांची असणारी शालेय फी,ट्युशन फी,खाणावळ फी,वस्तीगृह फी या बिकट परीस्थितीत कशी भरायची हा देखील प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहीला आहे.त्यामुळे शासनाने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची सर्व प्रकारची शालेय फी माफ करावी,रखडलेली व चालू वर्षाची शिष्यवृत्ती त्वरीत मिळावी,नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शाळकरी मुलांची एसटी पास फी माफ करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना बुधवारी  दिले,याप्रसंगी प्रमोद राजेंद्र म्हस्के,आदिल शेख,नागेश गांगर्डे,ऋषी पवार,केतन बाबर,मुकुंद चिखलठाणे,मनोहर सरोदे,अनिल बाबर,कुणाल घोडके,मयुर नलगे,अजय गाडे आदी विद्यार्थी उपस्थित होते,यावेळी प्रा.कानिफनाथ उगले यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांची व्यथा प्रशासनासमोर मांडली.विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांच्या वतीने साळुंके डी.एन यांनी स्वीकारले.


श्रीगोंदे तालुक्यातील ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी या मागणीचे निवेदन   देताना प्रमोद राजेंद्र म्हस्के ,प्रा.कानिफनाथ उगले व विद्यार्थी.

Post a Comment

0 Comments