Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करा ; आ. संग्राम जगताप यांची मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर अहमदनगर - अतिवृष्टीमुळे अहमदनगर शहरालगत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी नगर तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
अनेक शेतकऱ्यांचे आंबे, पेरु फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.अवेळी आलेल्या या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.बळीराजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी योग्य नियोजन करून भरपाई शासनाने द्यावी. तात्काळ संबंधित यंत्रणेला नालेगाव, बोल्हेगाव व बुरुडगाव परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावेत, असे निवेदनात आ.जगताप यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments