आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील नवनागापूर येथील सह्याद्री चौकात दुचाकी
चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. सुरज शिवाजी शिंदे ( रा.बुरुडगावरोड, आयटीआय काँलेजजवळ, अ.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीच्या नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोतवालीत दाखल गुन्ह्यातील आरोपी सुरज शिवाजी शिंदे हा नवनागापूर येथील सह्याद्री चौकात चोरीची बुलेट दुचाकी विकण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सह्याद्री चौकात पोलिसांनी सापळा लावून सुरज शिंदे याला बुलेटसह ताब्यात घेतले. विचारपुस केली असता, बुलेट चोरीची असल्याची कबुली दिली. २ लाख रु.राखाडी रंगाची क्लासिक ३५० बुलेट विनानंबर जप्त करण्यात आली. शिंदे यांच्या कडे अधिक चौकशी केली असता, अन्य चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी टिळक रोड येथील घराशेजारील मोकळ्या जागेत बारदानेखाली लपवून ठेवलेल्या दुचाकी काढून दिल्या. सपोनि संदीप पाटील, सफौ. सोन्याबापू नानेकर, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकाँ प्रकाश वाघ, राहुल सोळुंके, रणजित जाधव, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर आदीच्या पथकाने कारवाई केली.
0 Comments