Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रस्ता लुटीतील दोनजण एलसीबी पथकाकडून जेरबंद


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - रस्ता लुटप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी २४ तासाच्या आत पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. संग्राम रमेश गिते (वय २१ शिवाजीनगर, केडगाव, अ.नगर) व सौरभ जगदीश खंडेलवाल (वय १९, मोहिनीनगर, केडगाव, .अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साईकपा महाविद्याल ( घारगाव ता.श्रीगोंदा) येथे शिक्षण घेण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीवरुन अहमदनगर रेल्वे स्थानकावर उतरून पायी माळीवाडा बसस्थानकाकडे येत असताना दोन अज्ञातांनी मोटारसायकलवर येऊन मारहाण करून जवळ असणाऱ्या सँक बळजबरीने हिसकावून त्यातील १२०० रु. रोख व ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद वैभव प्रमोद झाडे ( रा.यशवंतरावनगर, हिंगणघाट, जि. वर्धा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. दाखल गुन्हा हा केडगाव येथील संग्राम रमेश गिते (वय २१ शिवाजीनगर, केडगाव, अ.नगर) व सौरभ जगदीश खंडेलवाल (वय १९, मोहिनीनगर, केडगाव, .अ.नगर) यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार केडगाव येथे जाऊन दोन्ही आरोपींचा शोध घेऊन पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, पोकाँ विनोद मासाळाकर, योगेश सातपुते, मयुर गायकवाड, राहुल सोळुंके आदींच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments