Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आमदार मोनिका राजळे यांच्याकडून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  शेवगाव - तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव व चापडगाव येथे  शेवगाव विधानसभेच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी  अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांची पाहणी केली. यावेळी  नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी किरण मोरे  व नायब तहसीलदार मयुर बेरड साहेब यांना दिले.
 शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे भास्कर कुटे, व दिनकर गर्जे यांच्यासह चापडगाव मंडळातील कपाशी व बाजरी पिकांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार मोनिका राजळे यांनी आज केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या कापूस तसेच  बाजरी पिकाचे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अशा संकटाच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आ राजळे यांनी यावेळी दिले आमदार राजळे यांनी चापडगाव येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव कडु दिवटे यांच्या कपाशी पिकाची पाहणी केली कापूस भिजल्याने तसेच कापसाची बोंडे सडल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे कापसाची पानगळ मोठ्या प्रमाणात झाली असून संपूर्ण कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे यावेळी राजळे यांनी प्रत्यक्ष पाहिले तर महेश पोपट गमे यांच्या बाजरीच्या पिकाची पाहणी आमदार राजळे यांनी यावेळी केली बाजरीच्या कणसाला अंकुर फुटले आहे त्यामुळे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे  यावेळी आमदार राजळे यांनी चापडगाव व परिसरातील शेतकऱ्यांची संवाद साधला व त्यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली यावेळी आमदार राजळे यांच्यासोबत भाजपा तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर ,भाजपा तालुका उपाध्यक्ष निलकंठ कराड ,भाजयुमोर्चा तालुकाध्यक्ष नितीन फुंदे, अंकुश ढाकणे, सुरेश नेमाने, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, नायब तहसिलदार मयूर बेरड, मंडलाधिकारी बडे, कामगार तलाठी शेंडे, आदी शेतकरी उपस्थित होते
----------------------------

बोधेगाव भागात जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या बाजरी पिकाची पाहणी करताना आ मोनिका राजळे, नितीन फुंदे, सुरेश नेमाने शेतकरी दिसत आहेत छाया राहुल थोरवे

Post a Comment

0 Comments