आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - श्री संत नागेबाबा मल्टीटेट व पतजंली योग समितीतर्फे दि.३ ते ८ ला योग चिकित्सा व प्राणायाम शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर झोपडी कँन्टीनजवळील बिशप लाँयडस् काँलनी, सावेडी येथे ६ दिवस नि:शुल्क सकाळी ५ ते ७.३० या वेळेत होणार असल्याची माहिती नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांनी दिली.
पतजंली योग समितीचे जिल्हा प्रभारी प्रा.बाळासाहेब निमसे म्हणाले की, शिबिरात स्वामी आनंददेवजी महाराज हे योगासने, ध्यानधारणेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण तसेच भगवत गीताचे प्रवचन होणार आहे. यावेळी मोफत जटीबुटी वनस्पतींचे वाटप केले जाणार आहे. आयुर्वेद तज्ञ्ज उपचाराबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहेत. आयुर्वेद प्राकृतिक, अँक्युप्रेशर, आहार चिकित्सांबद्दल माहिती दिली जाणार आहे.
या योगा शिबिरासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कडूभाऊ काळे, प्रा.निमसे, समितीचे कोषाध्यक्ष अविनाश ठोकळ, मधुकर निकम, धनाजी पारीक आदीसह अहमदनगर पतजंली योग समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
0 Comments