Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर ः जिल्हा न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याविरोधात अपिल दाखलामध्येही जन्मठेप कायम करण्यात आलेल्या फरारी आरोपी आदम कासम शेख (वय 48, रा. धनेगाव, ता.जामखेड, जि.अहमदनगर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फरार आरोपी शेख याला शोधून अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार शोध पोलिस घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना बातमीदारामार्फत आरोपी शेख हा लोणी काळभोर (जि.पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे धनेगाव येथे आरोपीचा शोध घेऊन त्यास पकडून जामखेड पोलिस ठाण्यात हजर केले आहे. शेख यांच्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात 302, 201, 407, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन त्यात आरोपी शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठात अपिल केले होते, त्यावरी सुनावणी झाल्यास खंडपीठात आरोपी शेख याची जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती. परंतु या दरम्यान, आरोपी शेख हा फरार झाला असता, त्याला अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना केले होते.
 जिल्हा पोलिस अधीक्षत ईशू सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत संजय सातव यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गणेश इंगळे, सफौ मनोहर शेजवळ, सफौ. सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ बबन मखरे, पोना विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, दीपक शिंदे, चालक पोहेकॉ. बाळासाहेब भोपाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.   

Post a Comment

0 Comments