Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रसाद खामकर यांची प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी उमेदवार प्रसाद खामकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी निवड झाली. त्यांचेकडे कोंकण आणि उत्तर महाराष्ट्र यांची जबाबदारी देण्यात आली आहे . त्यांना 27 नोव्हेंबर रोजी प्रदेश अध्यक्ष पराग पष्टे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र दिले.
अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीचा दृष्टीकोन,त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट, शेतकरी, शेतमजूर याबाबत काँग्रेसचे धोरण अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपण काँग्रेस पक्षाचे प्रभावी पणे काम करावे असे नियुक्ती पत्रात म्हंटले आहे. प्रदेश अध्यक्ष आणि माझ्यावर टाकलेली यशस्वीपणे पार पाडनार असून पुढील काळात शासनाच्या विविध योजना खेडोपाडी राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचेही खामकर यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे राज्यातून सामाजिक संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

0 Comments