Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील सहाही राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या पाठीशी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर :  राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडीत अचानक झालेल्या बदलामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार नेमके कुणाबरोबर? अशी चर्चा सुरु झाली होत्या. परंतु सोशल मिडियावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), प्राजक्त तनपुरे (राहुरी),रोहित पवार(जामखेड),निलेश लंके (पारनेर) आणि डॉ. किरण लहामटे (अकोला) अशा सहा आमदारांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
 रविवारी झालेल्या अचानक घडामोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी अचानक भाजपाला पाठिंबा देण्याचे आमदारांचे  पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांचा शपथविधीही झाला. या नाट्यमय घडामोडीनंतर काही कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आमच्या पक्षाचा भाजपाला पाठिंबा नाही. भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा अजित पवारांचा आहे. त्यामुळे आता अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांचा पाठिंबा आहे. याबाबत सगळीकडेच चर्चा झडल्या जात आहेत. त्यात अहमदनगर शहरातील काही आमदारांबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर सहाही आमदार असणारा फोटो सोशलमिडियावर फिरल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत सुरु असणार्‍या चर्चा पूर्णपणे थांबल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments