Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार मध्ये भाजपच्या बुथ निहाय कमिटी अध्यक्षांची निवड

भिंगार छावणी परिषदेत भाजपचाच उपाध्यक्ष होणार -दिलीप गांधी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - भिंगार छावणी परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिंगार भाजप मंडळाच्या वतीने बुथ निहाय कमिटीची बैठक माजी खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकित बुथ निहाय कमिटीवर 17 जणांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
दिलीप गांधी म्हणाले की, पक्ष बळकटीकरणासाठी सर्व बुथ निहाय अध्यक्षांनी भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या सर्व शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी समाजावून घ्याव्यात. सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू माणून विकासात्मक धोरणाने भाजपची वाटचाल चालू आहे. भिंगारमध्ये देखील केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. छावणी परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वच उमेदवार मताधिक्याने निवडून येणार असून, उपाध्यक्ष भाजपचाच होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर बुथ प्रमुखांना जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी निवडणूक अधिकारी श्रीकांत साठे, सरचिटणीस किशोर बोरा, भिंगार मंडळ अध्यक्ष शिवाजी दहीहंडे, वसंत राठोड, नगरसेविका शुभांगी साठे, लक्ष्मीकांत तिवारी, अनंत रासने, किशोर कटोरे, कैलास गव्हाणे, संतोष हजारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments