आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी दुफळी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या दुफळी मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार या दोघांपैकी कुणासोबत जातात, याकडे अहमदनगर जिल्ह्यातील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहेत. जिल्ह्यात आमदार संग्राम जगताप व प्राजक्त तनपुरे ही आमदार अजित पवार यांच्या नेहमीच संपर्कात राहिलेे असल्याने ही दोन्ही आमदार अजित पवारांबरोबर जाण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगल्या आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे ही सहा आहेत. यापैकी कोण शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या महाशिवआघाडी किंवा भाजप- अजित पवार यांच्या बरोबर जातात हे सोमवारी सांयकाळापर्यंत उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत वेगवेगळ्या चर्चा झडल्या जात आहेत.
0 Comments