आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - माजी आमदार नवनवीतभाई बार्शीकर यांच्या स्मृतीदिनी शनिवारी सांयकाळी ६ वा. पत्रकार वसाहतीतील आचार्य गुंदेचा भवनात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, नवाकाळाचे संपादक कै. नीळकंठ खाडिलकर यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बार्शीकर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष मुथा, ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता, डि.एस.कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा आदींच्या भाषणात कै.बार्शीकर नगराध्यक्ष व आमदार असताना अहमदनगर शहरात कशा पद्धतीने विकास कामे झाली होती, याबाबत त्यांचा आदर्श सध्याच्या राजकारणी मंडळींनी घ्यावा, असाच सुर उमटला. यावेळी अहमदनगर प्रेसक्लबचे माजी अध्यक्ष मन्सूरभाई शेख, नगरी दवंडीचे निवासी संपादक बाबा ढाकणे, पत्रकार राजेंद्र साटणकर, विठ्ठल शिंदे, हरिभाऊ डोळसे, हर्षदभाई आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments