Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताहचे नारळ पुणतांबा येथेच देणार-महंत रामगिरी महाराजसप्ताह नारळ मागणीसाठी भव्य मोटारसायकल रॅली ; श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे सप्ताहाची मागणी
श्रीक्षेत्र सरलाबेट(माळवाडगांव) -  प्रचलित परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीला पुणतांबा येथे सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताहचा नारळ दिला जात असल्याकारणाने सरलाबेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी स्पष्ट असे काही सांगितले नाही.तसेच आणखी काही गावांची सप्ताहसाठी मागणी असल्याने सर्वांचा विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.
         शिरसगाव येथे सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह व्हावा या मागणीसाठी शिरसगाव व पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष रिक्षा टेम्पो,जीप त्याचप्रमाणे न भूतो न भविष्यती असे हजारो पुरुष मोटारसायकल फेरीने महंत रामगिरी महाराज यांना भेटण्यास गेले होते.त्यावेळी मोठा जनसागर उसळला होता.गेल्या महिन्यापासून शिरसगाव ग्रामस्थ पंचक्रोशीत फिरून भेतोगाठी घेत होते.त्याचा आज परिपाक गर्दीने दिसून आला.सरला बेटाच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा भाविकांचा महापूर सप्ताहची मागणी करण्यासाठी सरला बेटावर जमला होता.विठ्ठल मंदिर शिरसगाव येथून निघालेल्या मोटारसायकल फेरीमध्ये इंदिरानगर,वडाळा महादेव,निपाणी वडगाव,अशोकनगर येथील भाविक सहभागी झाले होते.
           रामकृष्णनगर येथे वळद उंबरगाव ग्रामस्थ यांनी,श्रीरामपूर येथे मार्केट कमिटी,म.गांधी पुतळा, श्रीराम मंदिर चौक,येथे सोनार बंधू,अशोक उपाध्ये,भगतसिंह चौक येथे नगरसेवक रवी पाटील,गिरमे चौक येथे उपनगराध्यक्ष करण ससाणे,यांनी स्वत: स्वागत करून फेरीमध्ये सहभागी झाले.
        नगर परिषद श्रीरामपूर,शिवाजी चौक,गोंधवणी रोड,सरपंच भारत तुपे गोंधवणी,मनोज फरगडे,नंदू लबडे,खैरीनिमगाव ग्रामस्थ,आदींनी स्वागत केले व सहभागी झाले.सर्वत्र फटके आतिषबाजी करण्यात आली.सरला बेटावर फेरी गेल्यावर संदीप वेताळ ब्राम्हणगाव,बोरकर खंडाळा,विनोद मलिक वडाळा,दत्ता कांदे गोंधवणी,शंकरराव गागरे,डॉ बाबुराव उपाध्ये,करण नवले,विठ्ठलराव राउत,आबुभाई कुरेशी मुस्लिमभाई प्रतिनिधी,नारायणराव डावखर,मंजुश्री मुरकुटे,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,उपनगराध्यक्ष करण ससाणे श्रीरामपूर,वंदना मुरकुटे,रामभाऊ पटारे,खोकर,या सर्वांनी आपापल्या गावच्या वतीने मनोगतातून सप्ताहास पाठींबा दिला व आग्रह धरला.यावेळी आबुभाई कुरेशी यांनी एक दिवस सप्ताह काळात पंगत देण्याचे आश्वासन दिले.शिरसगावच्या वतीने दिनकर यादव यांनी प्रास्तविक केले.जी के पाटील,आबासाहेब गवारे,गणेशराव मुद्गुले,हे सप्ताहसाठी गटतट सोडून एकत्र आले व शेवटपर्यंत एकत्र राहतील हे विस्तृत केले.ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आभार प्रदर्शन केले व सर्वाना महाप्रसाद मिळाल्याने कार्यक्रमाची सांगता झाली.या कामी शिरसगाव व परिसर सर्व ग्रामस्थ,महिला,यांनी विशेष परिश्रम घेतले.श्रीरामपूर पोलिसांनी योग्य काळजी घेऊन सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments