Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अपिलात शिक्षा कायम असणारा फरारी आरोपी शेख जेरबंद


 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

नगर रिपोर्टर  
अहमदनगर ः उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील अपिलामध्ये शिक्षा कायम असणारा आरोपी हिरालाल कासम शेख (वय 45, मुळा रा. धनेगाव ता. जामखेड, जि.अ.नगर, ह.रा.मेंढापूर, ता. पंढरपूर, जि.सोलापूर) यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 1997 साली जामखेड पोलिस ठाण्यात भादवि कलम 376,511, 506 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(11) प्रमाणे हिरालाल शेख यांच्यावर एका महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांमध्ये आरोपी शेख विरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केेले. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीत आरोपी शेख याला एक वर्षे कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्धात आरोपीने उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले होेते. उच्च न्यायालयात अपिलाची सुनावणी होऊन शिक्षा कायम करण्यात आली. यानंतर आरोपी शेख हा फरार झाला होता. न्यायालयाने आरोपीचा शोध घेऊन हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. हा तपास सुरु असतानाच हिरालाल शेख हा पंढरपूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंढरपूर येथे जाऊन आरोपी शेख याचा शोध घेऊन त्यास पकडून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.
 जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई गणेश इंगळे, सफौ. मनोहर शेजवळ, पोहेकॉ बबन मखरे, पोना विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, चालक पोहेकॉ. संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.   

Post a Comment

0 Comments