Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने ६५ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ


पश्चिम बंगाल,तामिळनाडु, यु.पी., ए.पी., हरीयाणा, झारखंड, तेलंगाणा, राजस्थान, छतीसगड, ओरिसा यांची विजयी सलामी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे क्रीड़ा व  युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय, तसेच महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसीएशन आणि त्रिमुर्ति शैक्षणीक संकुल,  नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा येथील त्रिमुर्ति क्रीडा संकुलात आयोजित ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल १७ वर्षे मुलींच्या स्पर्धाना मोठ्या उत्साहात सुरवात झाली.  दि.२० ते २३ नोव्हेम्बर २०१९ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धांसाठी ४ अद्ययावत क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. या स्पर्धामध्ये विविध राज्याचे ३१ संघ सहभागी झालेले आहेत.
३0 संघांची आठ गटात विभागणी करण्यात आली असून, आज सकाळी या स्पर्धाना सुरवात झाली. यामध्ये पस्चिम बंगाल, तामिळनाडु, ऊत्तर प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगना, राजस्थान, छतीसगड, आणि ओडीसा या संघानी आपल्या साखळी सामन्यात सुंदर खेळ करुन विजयी सलामी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,  उप वन संरक्षक आदर्श रेड्डी, युवानेते उदयनराजे गडाख, महाराष्ट्र राज्य विधान परीषधेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हाधीकारी राहुल द्वीवेदी, त्रिमुर्ति शैक्षणिक संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील
भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे  परिहार, अहमदनगर जिल्हा क्रीडाधीकारी सौ.कविता
नावंदे - निंबाळकर महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष पार्थ दोषी, महाराष्ट्र हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यकमचे प्रमुख पाहुणे  राहुल द्विवेदी व अध्यक्ष आमदार  सुधिर ताबे यानी खेळाडूना शुभेच्छा  दिल्या व जिल्हा क्रीडाधीकारी सौ.कविता
नावंदे - निंबाळकर यानी आभार मानले, या  ठिकाणी अतिशय शानदार उद घाटन पार पडले
   महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष पार्थ दोषी, त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनीष घाडगेपाटील, प्राचार्य सोपान काळे, समन्वयक दत्तात्रय वांढेकर, प्राचार्य सचिन कर्डिले, प्राचार्य आशिष भारती, क्रीडा समन्वयक संजयसिंह चौव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॉलीबॉल समन्वयक पापा शेख, क्रीडा शिक्षक संभाजी निकाळजे, महादेव काकडे, अशोक पानकडे, गणेश शिंदे, किरण मोरकर, संदीप भालेराव, नागेश वराडे, सिद्धार्थ सरोदे आदी शिक्षकवृंद या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

निकाल
१) पश्चिम बंगाल विजयी विरुद्ध  (३- ०)
२) तामिळनाडु विजयी विरुद्ध असाम  (३- ०)
३) उत्तर प्रदेश विजयी विरुद्ध  सी.आय.               एस.सी.एस.  (३- ०)
४) हरियाणा विजयी विरुद्ध बिहार  (३- ०)
५) ए. पी. विजयी विरुद्ध छत्तीसगड़  (३- ०)
६) झारखड विजयी विरुद्ध आय.पी.एस.सी.         (३- ०)
७) तेलंगाणा विजयी विरुद्ध पोंदेचरी (३- ०)
८) राजस्थान विजयी विरुद्ध आसाम (३- ०)
९) छतीसगड़ विजयी विरुद्ध  एम. पी. (३- ०)
१०) ओरिसा विजयी विरुद्ध  उत्तराखंड (३- ०)Post a Comment

0 Comments