Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

समाजसेवक उदय सर्वगोड राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानितआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणाऱ्या समाजसेवक उदय ज्ञानू सर्वगोड यांना सेव्हन वंडर्स पब्लीकेशनच्या वतीने आयोजित शिर्डी येथे आयोजित १२ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात १७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीमधील कलोपासक गुणवत्तेला तसेच सुप्त प्रतिभेला प्रेरणा व प्रोत्साहन लाभावे याकरीता जागतिक प्रतिभाशक्तीच्या एकत्रिकरणाचा महासंकल्प म्हणून आशिया खंडातील अकरा देशांमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध प्रेरणा संमेलनांचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील संतनगरी शिर्डी येथे एक दिवसीय भव्य '१२ वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन - २०१९' चे आयोजन करण्यात आले होते.
उदय ज्ञानू सर्वागोड हे मागील अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रभरात सामाजिक सेवेचा वसा घेऊन कार्य करीत आहेत त्यांच्या आजवरच्या निस्वार्थ सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारतीय वायू सेनेचे पूर्व उपसेनापती लेफ्ट. जनरल गुरुमित सिंग,पद्मश्री विजयकुमार शहा,संमेलनाध्यक्ष राम गायकवाड,रानकवी जगदीप वनशिव, संयोजक क्रांती महाजन यांच्याहस्ते राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी योगमाता राजश्री देसाई, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सदस्या फरझाना डांगे,मुमताज पटेल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती होते
यावेळी मुंबई येथील नागोराव तायडे याना जीवन गौरव पुरस्कार तर ज्योती नेटवटे याना राष्ट्रीय शिक्षक  रत्न पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार हे आपल्या आयुष्याला प्रेरणा देतात त्यामुळे समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने आता कामाची जबाबदारी आणखी वाढली असून हा पुरस्कार मी समाजात कार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बहाल करतो असे प्रतिपादन यावेळी पुरस्कार प्राप्त उदय ज्ञानू सर्वगोड यांनी व्यक्त केले

Post a Comment

0 Comments