Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर रस्ता दुरुस्त करण्याची भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांची मागणी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शहरातून जाणाऱ्या चिंचपूर रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. दुचाकीसह फोरव्हिलर गाड्या चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. तरी रस्त्याची पाहात, संबंधित विभागाने चिंचपूररोड त्वरित दुरुस्त करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केली आहे.
शहरातून जाणारा वर्दळीचा रस्ता असलेला चिंचपूररोडवर अतिशय खराब झाला आहे.अनेक वर्षांपूर्वी या रस्ताचे डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर याकडे पूर्णतः सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे . डांबराचा पूर्ण थर यावरून निघून गेला तर त्यामधली खडी सुद्धा पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे. मोठ्या स्वरूपाचे खोलच खोल खड्डे पडल्याने नागरिकां बरोबर वाहन धारकांना याचा त्रास सहन करण्याबरोबर अपघात घडण्याच्या ही घटनेला सामोरे जावे लागत आहे.छोटे मोठे अपघात झाल्याने लोकांना दुखापती झाल्या आहेत. नाईक चौक,अजंठा चौक ,उपजिल्हा रुग्णालय ,टाकीय मजीद ,शनी मंदिर हा असणारा चिंचपूररोड मार्ग पूर्णपणे याची चाळण झाली आहे. याचा मार्गावरून अनेक भाविक नवरात्री मध्ये पायी अथवा वाहनांनी ये जा करत असतात . मोहरी ,महिंदा ,मोहटा ,करोडी ,चिंचपूर इजदे ,चिंचपूर पांगुळ ,टाकळी मानूर या परिसरातील नागरिक व्यावहारीक दृष्टया या रस्ताचा वापर करतात .असे असतांना सार्वजनिक खात्याने याकडे हा मार्ग आपला आहे की नाही ? याची माहिती त्यांना नसावी असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.या रस्ताचे येत्या 7 दिवसात दुरुस्ती कारणाचे काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्या विरोधात आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी दिला आहे . 

Post a Comment

0 Comments