Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा उद्योजक लाॅबीच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे नगरमध्ये आयोजनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  भारत देशातील मराठा व्यावसायिक व उद्योजकांना एकत्र आणत सुरु करण्यात आलेल्या मराठा उद्योजक लॉबीचा दुसरा वर्धापन दिन मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर शहरातील साई मुरली लॉन्स येथे साजरा होत असल्याची माहिती एम.यु.एल.चे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी राजेंद्र अौताडे,अशोक कुटे,किशोर मरकड,संदीप खरमाळे,उदय थोरात आदी उपस्थित होते.मराठा उद्योजक लॉबी नावाचे रोपटे तीन वर्षांपूर्वी लावण्यात आले होते.त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून, प्रत्येक जिल्ह्यातून नव्हे तर भारतभरातून मराठा व्यवसायिक बांधव आपल्या एम.यु.एल. परिवारात सामील होऊन उद्योग-व्यवसायात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.सक्षम मराठा,सक्षम उद्योजक या उक्तीप्रमाणे मराठा बांधवांचे व्यवसाय व त्यांच्या व्यवसायाला नवी उंची प्राप्त करुन देण्यासाठी सवेगवेगळ्या स्तरातील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.या सोहळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह संपुर्ण भारतातून तसेच विदेशातून ही मराठा व्यावसायिक बांधव यावेळी उपस्थित राहणार असून,या मेळाव्यास मराठा बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त मराठा बांधवांचे व्यवसाय तसेच व्यवसायाची माहितीचे आदान-प्रदान करण्याची मोठी संधी या कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्या त आली आहे.
तसेच व्यवसाय व उद्योगाच्या भरभराटीसाठी तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे.हा मेळावा सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत चालणार आहे.या मेळाव्याचे शुभारंभ हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते होऊन,व्यवसायाचे मानसशास्त्र, व्यवसायातील संधी व व्यवसायाचे आर्थिक नियोजन अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.संपूर्ण भारतभरातून आलेल्या वेगवेगळ्या व्यवसायाचे व्यावसायिक प्रदर्शन पाहता येणार आहे. सामाजिक,व्यावसा यिक व वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच जवानांच्या कुटुंबियांना मराठा योद्धा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments