Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साकत दरोड्यातील आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - साकत परिसरात बोलवून कु-हाडीचा धाक दाखवून ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणारा आरोपीस देहू ता.हवेली जि.पुणे येथे एमआयडीसी परिसरातून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. साहेबराव उर्फ साहेबा गजानन काळे (वय ३५, रा.दहीगांव साकत, ता.जि.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने देहू ता.हवेली जि.पुणे येथे एमआयडीसी परिसरात सापळा लावून आरोपी काळे याला पकडण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि शशिकुमार देशमुख, पोहेकाँ दत्तात्रय हिंगडे, पोना संदीप पवार, रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, मयुर गायकवाड, सागर सुलाने, मेघराज कोल्हे, बाळासाहेब भोपळे आदींनी ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments