Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू !
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे आता राज्यामध्ये राष्ट्रपती लागवट लागू झाली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
महाराष्ट्राचा कारभार आता राजभवनातून चालणार असून तीन सनदी अधिकारी नेमले जाणार असून ह्या साठी जास्तीत जास्त वेळ 6 महिन्यांचा असू शकतो,या वेळेत जर कोणीच सत्तास्थापनेसाठी पुढे आले नाही तर राज्यात पुन्हा निवडणुका होवू शकतात.
राज्यात आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पहिल्यांदा १७ फेब्रुवारी १९८० मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी पवार समाजवादी काँग्रेस स्थापन करून पुलोद सरकारचं नेतृत्त्व करत होते. इंदिरा गांधींनी पवारांचं सरकार बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी जवळपास ११२ दिवस (१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती

Post a Comment

0 Comments