Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत फरार आरोपीस एलसीबी पथकाने पकडले


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पाथर्डी येथे इंदिरानगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून फरार आरोपी अमोल नामदेव धोत्रे (वय २८) यास पकडले.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि.२४ आँक्टोबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर-अकोळनेर-सोनेवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील बायपास चौकापुढे असणाऱ्या नाल्याजवळ गणेश दिनकर झिजुंर्डी (वय २७, भगवानबाबानगर, पाथर्डी), संजय आण्णा मोहिते (वय २१ इंदिरानगर, पाथर्डी), महेंद्र सुरेश आरगडे (वय २५ माणिकदौंडीरोड, इंदिरानगर, पाथर्डी), नेवीन संजय माने (वय २०, कासार पिंपळगाव ता.पाथर्डी) ही सर्वजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असताना चौघांना पकडले. त्याच्या कडून एक लोखंडी तलावार, दोन लाकडी दांडके, नायलॉन दोरी, मारुती ८०० कार ( नं.एम एच १२, डिएस ७५०३) व वेगवेगळ्या कंपन्याच्या ७ मोबाईल असा ६८ हजार ३०० रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी पकडण्यात आलेल्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु या घटनेवेळी अंधाराचा फायदा घेऊन शौकत दिलावर शेख ( इंदिरा नगर, पाथर्डी) व अमोल धोत्रे ही दोघे फरार झाली होती. यात धोत्रे यास पाथर्डीत स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ सोन्याबापू सोनटक्के, पोना सचिन आडबल, रविंद्र कर्डिले, प्रकाश वाघ, रणजित जाधव, जालिंदर माने, दीपक शिंदे आदींच्या पथकाने सापळा लावून जेरबंद केले.

Post a Comment

0 Comments