Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरला हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा ; कुंटणखाना चालक महिलेस अटकआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील तारकपूर भागात सुरू असणाऱ्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी शुक्रवार (दि.२२) छापा टाकला. छाप्यात कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. तर एका बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील तारकपूर बसस्थानका समोरील प्रेरणा आर्केड बिल्डिंग बिल्डिंग मध्ये 14 /55 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू , अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक विकास वाघ, पोलीस हवालदार निपसे ,पोलीस नाईक काळे, पोलीस नाईक भांड, पोलीस कॉन्स्टेबल पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहकले आदीच्या पथकाने प्रेरणा बिल्डिंग मधील फ्लॅट नंबर 306 येथे छापा टाकून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार एका बांगलादेशातील मुलीची सुटका करून कुंटणखाना चालवणारी महिलेस अटक करण्यात आली आहे.
स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे संबंधित महिलेविरोधात तोफखाना पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1585/2019 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments