Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी नगरसेवक उडाणशिवे यांच्यासह 13 जणांना निवडणूक लढवण्यास तीन वर्षे बंदी; आयुक्तांची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्यासह 13 जणांना
3  तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे .. नाशिक विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. 10  महिन्यांपूर्वी झालेल्याअहमदनगर  महापालिका निवडणुकीत 13 जणांनी विविध पक्षांकडून उमेदवारी केली होती.  निवडणूक निकालानंतर 30 दिवसांत निवडणुकीचा खर्च हिशेब सादर केला नसल्याने त्यांच्यावर3  वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली आहे.
 विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी  13 जणांना पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. या आदेशाच्या प्रती महापालिकेला देण्यात आल्या आहेत व महापालिकेनेही जनतेच्या माहितीसाठी नोटीस बोर्डावर त्या लावल्या आहेत. या आदेशामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे .
महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये झाली. जनतेतून निवडून द्यावयाच्या 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 339 उमेदवार उभे होते. या उमेदवारांना निवडणुकीत प्रचार व अन्य खर्चासाठी प्रत्येकी पाच लाखांची खर्चमर्यादा होती; तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभरात झालेल्या खर्चाचा हिशेब देणेही बंधनकारक होते. त्यानुसार 324 जणांनी आपले हिशेब व आवश्यक शपथपत्रे वेळेत सादर केली, पण 15 जणांनी केली नव्हती. त्यामुळे त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. यात फक्त तिघांनी म्हणणे मांडले. यापैकी दोघांचे ग्राह्य धरले गेले, तर एकाचे म्हणणे फेटाळले गेले. बाकी 12 जणांनी तर म्हणणेही सादर केले नाही व सुनावणीच्या वेळी ते हजरही राहिले नाहीत.
मुंबई प्रांतीय मनपा अधिनियम 1949 चे कलम 10 (1-ई) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित वेळेत व आवश्यक रितीने निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केलेल्यांना अनर्ह (अपात्र) ठरवण्याची तरतूद आहे. निवडणूक खर्च व शपथपत्र देण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निकालानंतर 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्या कालावधीत खर्च व शपथपत्र सादर झाले नाही, तर संबंधितांना अपात्र ठरवण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 

Post a Comment

0 Comments