Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरात दोन्ही भैय्यांसाठी अपक्षांसह अन्य पक्षांचे उमेदवार डोकेदुखीअनिलभैय्या राठोड यांना दोन 'श्री' त्रस्त ठरणार

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर (बाबा ढाकणे)
अहमदनगर - शहरात खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार अनिलभैय्या राठोड व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्रामभैय्या जगताप या दोन्ही उमेदवारांमध्येच होते आहे. परंतु या दोन्ही भैय्यांसाठीच्या जय-पराजयला निवडणुकीच्या रिंगणातील १० अपक्ष व इतर अन्य पक्षाचे ६ उमेदवार मंडळी डोकेदुखी ठरणार आहे.
यात राठोड व जगताप ही दोघेही कुणाला पावन करतात यावरही दोन्ही भैय्यांचे सत्ता केंद्रे अवलंबून राहणार असून यात माजी खा.दिलीप गांधी भाजप गट काय भुमिका घेतात, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही बाब विशेषतः शिवसेनेला घातक ठरू शकते. यामुळे आता अपक्षांमधून कोण माघार घेतात किंवा अन्य पक्षाचे कुणाला पाठिंबा देतात, यावरही नगर शहरातील आमदारकीचे गणिते अवलंबून असणार आहेत.
वास्तविक पाहता शिवसेनेचे उमेदवार अनिलभैय्या राठोड यांना बहुजन समाज पार्टीचे उमेदवार श्रीपाद छिंदम व अपक्ष उमेदवार श्रीराम येंडे यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी होणार आहे. छिंदम यांना मानणारा विशिष्ट शहरातील एक वर्ग त्यांच्या मागे आहे. त्या मतदाराची भूमिका आमदारकीच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे छिंदम हा उमेदवार राठोड यांच्यासाठी त्रासदायक ठरु शकतो. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार श्रीराम येंडे तेही जुने शिवसैनिक असून यांचाही शहरात चांगला परिचय आहे. त्यामुळे त्यांना ही मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे. यात पुन्हा मनसेचे उमेदवार संतोष वाकळे हे असून त्यांच्यासह मनसे पक्षाला मानणारा शहरात मोठा तरुण वर्ग आहे. हा सर्व मतदार यापूर्वी शिवसेनेकडे झुकलेला होता. यामुळे ही वस्तुस्थिती राठोड यांना नाकारुन चालणार नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनाही कम्युनिस्ट पक्षचे उमेदवार बहिरनाथ वाकळे, वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार किरण काळे व अपक्ष उमेदवार संजय कांबळे ही मंडळी डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे श्रीराम येंडे, श्रीधर दरेकर, संदीप सकट, संजय कांबळे, राजु गुजर, सुनिल फुलसौंदर, सचिन राठोड, सुभाष शिंदे, सुरेश गायकवाड आणि मिर सुलतान यापैकी कोण माघार घेते आणि उर्वरित अन्य पक्षाचे उमेदवार कुणाला पाठिंबा देतात का लढतात हे समोर येईल.

Post a Comment

0 Comments