Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आमदार राजळे हे कर्तबगारीने नाही तर अपघाताने आमदार झालेले आहेत : प्रताप ढाकणे

मा.आ.नरेंद्र घुले, मा.आ.चंद्रशेखर घुले यांची उपस्थिती
मा.केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे भावनिक आवाहन
आँनलाईन न्यूज नेटवर्क / व्हिडिओ
नगर रिपोर्टर
शेवगाव -  शेवगाव पाथर्डी मतदार संघ क्रमांक २२२ साठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून प्रताप ढाकणे यांना उमेदवारी जाहीर होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सकाळी दाखल केला. यावेळी मा.आ.नरेंद्र घुले, मा.आ.चंद्रशेखर घुले हे उपस्थित होते.शुक्रवारी (दि.४) सकाळी कार्यकर्त्यांची शेवगाव तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी पहावयास मिळाली. यावेळी शेवगाव पाथर्डी रोडवर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर फडके मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी या सभेचे अध्यक्ष म्हणून मा.आ.नरेंद्र पाटील घुले हे होते. या सभेचे सूत्रसंचालन शरद सोनावणे यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. क्षितीज घुले, बाळासाहेब ताठे, संजय नांगरे, संजय फडके, बंडू बोरुडे, मन्सूर भाई फारुकी, राजेंद्र नागरे या मान्यवरांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
 मा.आ.चंद्रशेखर घुले म्हणाले कि, विद्यमान आमदाराचे तालुक्यात एकही काम भरीव असे नाही. भरीव कामे आम्ही केली व भविष्यातही भरीव कामे काय असतात दाखवून देऊ. ताजनापुर प्रकल्पासाठी एक रुपयाचाही निधी आणला नाही. शेवगाव पाथर्डी पाणी योजनेसाठी कोणताही भरीव निधी त्यांना आणता आला नाही. अशी जोरदार टीका चंद्रशेखर घुले यांनी मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली.
 प्रताप ढाकणे म्हणाले कि, कोणत्याही अधिकाऱ्यांवर लोक प्रतिनिधींचा वाचक राहिलेला नाही. आमदार काय असतो हे आम्ही चंद्रशेखर घुले यांच्या काळात पहावयास मिळाला. हे आमदार कर्तबगारीने नाही तर अपघाताने झालेले आहेत. ट्रकभर नारळ फोडून एकप्रकारे जनतेची दिशाभूल आमदारांनी केलेली आहे. ११०० कोटींचा निधी जर खर्च झाला असता तर आपला मतदार संघ स्वर्गसारखा लखलख चमकला असता. त्यामुळे यांना घालवा असे आवाहन यावेळी प्रताप ढाकणे यांनी केले.
दीड लाख कर्ज माफी करण्यासाठी दीडशे कागदे गोळा करूनही कर्ज माफ झालेच नाही. कांदा प्रश्न आणेवारीचा प्रश्न, वीज प्रश्न इत्यादी प्रश्नांवर नरेंद्र घुले पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

चौकट:-

यावेळी भावनिक आवाहन करताना मा.केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे म्हणाले कि, मी आजपर्यंत मुलासाठी नातवासाठी कुणासाठीहि मते मागितली नाहीत, परंतु प्रताप हा गेल्या २० वर्षांपासून जनतेसाठी संघर्ष करत आहे. यावेळेस प्रतापबरोबर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी आज पहिल्यांदाच प्रतापच्या पाठीशी उभा राहिलो आहे. जनेतेने आता प्रतापच नाहीतर तुम्ही स्वतच आमदार आहात असे समजून या निवडणूक प्रक्रियेकडे पहा असे जाहीर आवाहन उपस्थित जनतेला केले.

यावेळी शिवशंकर राजळे, राजा दौंड, ऋषिकेश ढाकणे, अरुण पाटील लांडे, अमोल फडके, मयूर वैद्य, मोहनराव देशमुख, काकासाहेब नरवडे यांच्यासह राष्ट्रवादी आणि आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments