Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ३० अर्जांपैकी ८ अर्ज अवैध


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव - विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव - पाथर्डी (२२२ ) मतदार संघात शनिवारी ( ५ ) उमेदवारी अर्जाच्या छाननीत २० उमेदवारांनी दाखल केलेल्या ३० नामनिर्देशन अर्जांपैकी ८ अर्ज अवैध ठरविण्यात आले. १६ उमेदवारांचे २२ नामनिर्देशन अर्ज वैध ठरले.
प्रभावती अँड प्रतापराव ढाकणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पर्यायी उमेदवार म्हणून दोन अर्ज दाखल केले होते. अँड प्रतापराव ढाकणे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अर्ज वैध ठरल्याने त्यांचा दोन्ही अर्ज अवैध ठरिण्यात आले. सचिन नानासाहेब उगले व संजय सुर्यभान लहासे या दोघांच्या अर्जासोबत जुने पासबुक झेरॉक्स जोडल्याने त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले. विजय बाबुराव आव्हाड यांनी १० प्रस्तावकाऐवजी ३ प्रस्तावक दिले होते. तसेच नमुना क्र. २६ वर स्वाक्षरी केलेली नसल्याने त्यांचा अर्ज ठरला. जि.प. सदस्या हर्षदा काकडे व अमोल गर्जे या दोघांनी भाजप कडून प्रत्येकी एक नामनिर्दैशन अर्ज दाखल केले होते. ते अवैध ठरले. तर उर्वरीत अपक्ष अर्ज वैध ठरले.  कमरूद्दीन शेख यांचा एमआयएम  कडून भरलेला अर्ज अवैध तर अपक्ष अर्ज वैध ठरला.
  छाणनी प्रक्रीयेच्या वेळएस निवडणुक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विनोद भामरे व नामदेव पाटील यांनी काम पाहीले.

Post a Comment

0 Comments