Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुढील काळातही रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - आ.संग्राम जगतापआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर - रिक्षाचालक हा समाजामधील महत्वाचा घटक आहे. त्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. ते सोडविण्याचे काम मी केलेले आहेत. त्यांचा परमिटचा प्रश्नही मार्गी लावला आहे. शासनदरबारी रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले आहेत. रिक्षाचालकांशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे. मी शाळेत असल्यापासून ते नाते जपले आहे, त्यामुळे या पुढील काळातही रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आ.संग्राम जगताप यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायत, अ.नगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना, प्रजा चालक मालक संघटना, भीम ऑटो ग्रुप यांच्यावतीने आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वैभव जगताप, अविनाश घुले, समीर कुरेशी, प्रा.अरविंद शिंदे, ताजोद्दीन मोमीन, शाहू लगोरे, गुलाम दस्तगिर, उस्मान पठाण, विजय शेलार, विशाल खांडरे, भाऊसाहेब हुच्चे, दत्तात्रय साबळे, फैरोज तांबोळी, सुलतान पठाण, सागर काळभोर, सलीम शेख, नासीर पठाण, बाबा सोनवणे, इम्रान शेख, गोरख शिंदे, संजय धाडगे, सलीम शेख, प्रकाश गोसावी, राजेंद्र टिपरे, अशोक औशीकर, लतिफ शेख, विलास कराळे, केशव बरकते, रेखा जरे, सुरेखा सांगळे, बबन बारस्कर, अल्लाउद्दीन पठाण, अभय पतंगे, बाळू राऊत, शाहिद खान, तौसिफ शेख, अजीज शेख, आमजद मोमीन आदींसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरामध्ये मी विकासाचे रोपटे लावले आहे. त्याचा वटवृक्ष करण्यासाठी नगर शहरातील जनतेने पुन्हा विधानसभेवर जाण्याची संधी द्यावी. शहराचे उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे. रिक्षावाल्याचा मुलगा रिक्षावाला नाही करायचा तर त्याला चांगले शिक्षण देऊन अधिकारी करायचे आहे, हे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments