Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरात आ.जगताप, राठोड यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात; ११ अपक्ष उमेदवारआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून १७ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. यात सहा राजकीय पक्षांसह तब्बल ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. शुक्रवार अखेर एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप, शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड, कम्युनिस्ट पक्षाकडून बहिरुनाथ वाकळे, वंचित बहुजन आघाडीकडून किरण काळे, मनसेकडून संतोष नामदेव वाकळे, तर बसपाकडून नगरसेवक श्रीपाद छिंदम आदींचा समावेश आहे. श्रीराम येंडे, श्रीधर दरेकर, संदीप सकट, संजय कांबळे, राजू गुजर, सुनील फुलसौंदर, सचिन राठोड, सुरेश गायकवाड, प्रतिक बारसे, सुभाष शिंदे, नगरसेवक मीर आसिफ सुलतान आदी ११ उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

Post a Comment

0 Comments