Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आमदारला मत द्यायचे की नामदारला, हे आता मतदारांनी ठरवले आहे - प्रा.शिंदे
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत-जामखेड -मतदारसंघात जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता आमदारला मत द्यायचे की नामदारला, हे आता मतदारांनी ठरवले आहे. सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा यामुळे दिवसेंदिवस जनतेचे समर्थन वाढत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील राजुरी, पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आपटी, पिंपळगाव आळवा, वाघा, महारुळी, गुरेवस्ती, नान्नज, धोंडपारगाव, झिक्री, सांगवी, दिसलेवाडी आदी गावात पालकमंत्री शिंदे यांनी शनिवारी (दि.१२) भेटी देउन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नान्नज येथील उरेवस्ती येथे बोलताना त्यांनी रोहित पवारांवर तोफ डागली. मतदानानंतर रोहित पवार मतदारसंघात दिसणारच नाहीत, असे ते म्हणाले. पालकमंत्री शिंदे म्हणाले की, मागील पाच वर्षांत मंत्रीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणला. त्यामुळे वीज, पाणी, रस्ते या मुलभूत समस्या सोडवल्या. आता पुढील काळात शेतीला कायम पाणी मिळावे, यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार आहे. साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. तसेच सूतगिरणी मंजूर करून नऊ कोटींचा निधी मिळवून दिला आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील याकरिता बचतगटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. केवळ चॉकलेट, गोळ्या व पॅड वाटून मते मिळत नाहीत. येथील जनता अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही. आपल्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे जनता दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुस्लिम समाजाची बैठक अमजद पठाण यांनी घडवून आणली. त्यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्या मांडल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच पिंपळगाव (उंडा) येथील गावकऱ्यांनी राम शिंदे यांची घोड्यावरुन मिरवणूक काढली.

Post a Comment

0 Comments