Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विकासाचा चेहरा म्हणून पुढे घेऊन जाणारा संग्रामभैय्या सारखा उमेदवार - खा.कोल्हे


राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ सभा

आँनलाईन न्यूज नेटवर्क / व्हिडीओ
नगर रिपोर्टर
अहमदनगर - गेल्या पाच वर्षात तरुणांना रोजगार मिळावा. शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी विकासाचा चेहरा म्हणून पुढे घेऊन जाणारा संग्रामभैय्या सारखा उमेदवार आहे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
अहमदनगर येथे माळीवाडयात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप आदीसह आजी,माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा.कोल्हे म्हणाले की, विधानसभा निवडणूक म्हणजे केवळ दोन उमेदवारांमध्ये नाही किंवा दोन पक्षांमध्ये नाही. येणारी निवडणूक ही दोन विचाराची लढाई आहे. शाहू-फुले-आंबेडकराचा विचार या पुरोगामी महाराष्ट्रात जिवंत ठेवायचा की नाही, येथील तरुणाचे भवितव्य सुरक्षित ठेवायचे की नाही, हे ठरविणारी निवडणूक आहे. केवळ संग्रामभैय्या जगताप तुमचा उमेदवार नाही. त्या उमेदवाराच्या मागे शरद पवार साहेबाचा विचार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून येणाऱ्या २१ तारीखेला मतदानला जा, असे ते म्हणाले.
आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले, पाच वर्षात विकासाच्या कल्पना सर्वानी मिळून केलेल्या आहेत. ज्या विश्वासाने नगरकरांनी पाच माझ्या सारख्या तरुणाला या नगरचे प्रतिनिधित्व करण्याची व महाराष्ट्राच्या विधानसभेत संधी दिली. विकासाच्या संकल्पना या शहरात राबवू शकतो. हे नगरकरांसमोर मांडल्या. त्यावर कुठेतरी नगरकरांनी माझ्या संदर्भात निर्णय घेतला. त्या पद्धतीने गेलेल्या पाच वर्षात शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या प्रकारे काम करु शकलो. नगर शहराच्या उपनगरात अनेक मोठमोठ्या कामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याच माध्यमातून कुठे तरी तरुण पिढीला आयटी पार्क च्या माध्यमातून पाच वर्षात ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप म्हटले.
यावेळी प्रा.अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विनित पाउलबुद्धे आदी सह आजी-माजी नगरसेवक, दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments