Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पक्ष न पहात प्रतापकाकांना साथ द्या : ढाकणे


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - पक्ष पाहू नका, तालुक्यातील समस्यांचा विधानसभेत आवाज उठविणारा आपला माणूस म्हणून पाठवा, त्यामुळे प्रतापकाका ढाकणे यांनाच मोठ्या मताधिक्याने साथ द्या, असे प्रतिपादन गायत्री फौडेंशन अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ, वडगाव, चिंचपूर इजदे आदीसह परिसरातील वाड्यात वस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अँड प्रतापकाका ढाकणे यांच्या प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रचारफेरीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
ढाकणे पुढे म्हणाले की, शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील आवाज विधानसभेत आत्तापर्यंत घुमलाच नाही. त्यामुळे येत्या दि.२१ आँक्टोबरला पक्ष न पहात आपला हक्काचा माणूस म्हणून प्रतापकाका ढाकणे यांच्या कडे पाहून विशेषात: आपल्या माणसांनी घराघरात परिवर्तन घडवा. काकांना साथ दिल्यास ते नक्कीच विधानसभेन सभेत आवाज उठून पाथर्डी तालुक्याला न्याय देण्याची भुमिका मांडतील. विकास कामांबरोबर तळागाळातील आपल्या माणसाचाही आर्थिक स्तर उंचवला पाहिजे, त्यासाठी आपल्यातील स्थानिक नेतृत्व पुढे आले पाहिजे. यासाठी आपल्या माणसांनी आपल्या माणसासाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments