Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कारवाई करा - विधाते


जिल्हा पोलिस अधीक्षकांना राष्ट्रवादीचे निवेदन
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याची प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवाराकडून प्रयत्न होत असल्याचे निवेदन जिल्हा पोलिस प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी दिले आहे.
निवेदनात, अहमदनगर शहरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार व त्याचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे जाणीवपूर्वक कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. जाणीवपूर्वक एखादी घटना घडवून त्याचे राजकीय भांडवल करण्यास कसे पटईत आहेत. हे विविध घटनेतून सिद्ध झाले आहे. मागील मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या काही तडीपार व गुडप्रवत्तींच्या पदाधिकाऱ्यांनी सारसनगर भागात रिक्षा रात्री च्या वेळी जाळून त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नगर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विधाते यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments