Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आ.संग्राम जगताप यांना सर्व ब्राम्हण संघटनेचा पाठिंबा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यासाठी नगर शहरातील ब्राह्मण  समाजाची महत्वपूर्ण बैठक सावेडीत संपन्न झाली.  जिल्हा ब्राह्मण सेवा संघ व श्री परशुराम प्रतीष्ठान या संघटनांच्या पुढाकाराने ही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी ब्राह्मण समाजाने पहिल्यांदाच सर्व समाज संघटना एकत्र येऊन बैठक घेतली. या बैठकीला शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

         या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बहुतांशी नोकरी आणि व्यवसाय यात काम करणाऱ्या बुद्धिजीवी वर्ग म्हणून ब्राह्मण समाजाकडे पाहिले जाते. ब्राह्मण समाज कोणत्याही एका पक्षाचा किवा संघटनेचा नसून, कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजात गृहीत धरू नये. आज समाजाला गरज आहे ती समाजातील तरुण-तरुणींना नोकरी मिळण्याची, व्यवसायात संधी मिळण्याची. आतापर्यंत निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाजाला केवळ वापर केला गेला. मात्र कोणीहीसमाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची ही वेळ आली आहे. जो समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, ब्राह्मण समाजातील सामान्य नागरिकांना साथ देतो व समाजा मागे कायम सक्षमपणे उभे राहतात अशा आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी एकमताने पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्व ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी घेतला. या महत्त्वपूर्ण बैठकीला सर्व क्षेत्रात काम करणारे, सर्व पक्षात काम करणारे  ब्राम्हण  समजातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
         आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी ब्राह्मण समाजाला वेळोवेळी पाठवलेले आहे. ब्राह्मण समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. ब्राह्मण समाजातील कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे गेले असतात त्यांचेही प्रश्न जगताप कुटुंबियांनी सोडवले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शहरातील सर्व ब्राह्मण संघटना आ.संग्राम  जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असून पक्ष न बघता काम करणारा व्यक्ती  म्हणून संग्राम जगताप यांच्याकडे  पाहून मतदान करावे असे आव्हान या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आले.
       आत्तापर्यंत ब्राह्मण समाजाला शिवसेना, भारतीय जनता पार्टीने कायम गृहीत धरून वापर करून घेतला. मात्र ब्राह्मण समाजासाठी  काहीही निर्णय घेतले नाही. पंचवीस वर्षे आमदार असलेल्या अनिल राठोड यांनीही ब्राह्मण समाजाकरता काय केले असा सवाल या  बैठकीत करण्यात आला. याउलट आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी ब्राह्मण समाजाच्या ऋग्वेद भवनासाठी, सनातन धर्म सभेसाठी विकास निधी दिला आहे. तसेच कायम ब्राह्मण समाजाच्या प्रति आदर व्यक्त करत विविध उपक्रमांना, कार्यक्रमांना सहकार्य केले आहे. असा सूर या बैठकीत निघाला.
         या बैठकीत केडगाव ब्राम्हण संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी, उद्योजक श्रीकृष्ण जोशी, चित्रपट निर्माते अनिल जोशी, आदिनाथ जोशी, आबा एडके, प्रमोद मोहोळे, अॅड.स्वाती नगरकर, राजेश भालेराव, किशोर जोशी, पद्माकर कुलकर्णी, अमित गटणे, निखील कुलकर्णी, श्री.बडवे, मंगेश निसळ, सुमित कुलकर्णी, विजय देशपांडे, राधेश्याम शर्मा आदींनी आपले मनोगत व्यक्त करून जगतात कुटुंबीयांनी वेळोवेळी कशी साथ दिली याबद्दल सांगितले.
      उद्योजक श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाला कायम जगताप घराण्याचा आधार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष कडे न बघता आपल्या हक्काचा माणूस म्हणून संग्राम जगताप यांना मतदान करावे असा ठराव मांडला. त्यास उपस्थित सर्व समाज बांधवांनी जय परशुराम.... जय परशुराम... असा जयघोष करत एकमताने मंजूर केला.
या बैठकीचे प्रास्ताविक सुमित कुलकर्णी यांनी केले अॅड. प्रसंना जोशी यांनी सूत्रसंचालन केले इंजिनियर मकरंद कुलकर्णी यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments