आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - सोशल मीडियावर होणाऱ्या निवडणूक बाबत घटना व हालचाली यांची पाहणी तसेच देखरेख करण्यासाठी सोशल मिडिया मँनिटरिंग आणि कंट्रोल कक्ष मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबईचे नोडल अधिकारी डाँ. बाळसिंग राजपूत यांनी दिली.
सेलच्या अहवालानुसार सोशल मीडियावर (विशेषतः ट्विटर, फेसबुक, व्हाँटअप व अन्य) ईव्हीएम मशिन बाबत नकारात्मक बातम्या, अपप्रचार आणि अफवांचा प्रसार करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शासकीय सोशल मीडिया प्लँटफाँर्मचे माध्यमातून निवडणूक आचारसंहितेशी संबंधित सोशल मीडियाचे माध्यमाचे देखरेख करताना आक्षेपार्ह चित्रफीत, छायाचित्रे निदर्शनास आल्यास तसेच त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास त्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, त्या बाबतीचा अहवाल तात्काळ नोडल अधिकारी यांच्याकडे readerl.spchr-mh@gov.in या मेलवर पाठवावा, असे आवाहन राजपूत यांनी केले आहे.
0 Comments