आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शेवगाव, पाथर्डी परिसरात घरफोडी, दुचाकी चोरणारे सरईत दोन चोरट्यांना अटक केली असून, ७ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. अक्षय सुरेश गवळी (वय २२, रा.दहेगाव ता.शेवगाव), अजय अशोक माने (वय २४, मिलिंद नगर ता.जामखेड) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अक्षय गवळी व अजय माने ही दोघे चोरटे शेवगाव, पाथर्डी परिसरात घरफोड्या, चोरलेल्या दुचाकी शेवगाव बसस्थानकात विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत, अशी माहिती एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली, त्यानुसार पवार यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकाने शेवगाव बसस्थानकात सापळा लावून आरोपी गवळी व माने यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातील एच एक्स डीलक्स विनानंबर गाडी घेत कागदपत्रे विचारणा केली असता, उडावाउडवीचे उत्तर दिली, विश्वास घेतल्याने दुचाकी चोरीच्या असल्याचे सांगितले. शेवगाव, पाथर्डी येथून साथीदार संजय बर्डे ( आपेगाव ता.पैठण), संजय चव्हाण ( बोरगाव ता.गेवराई), सचिन चव्हाण (बोरगाव ता.गेवराई), मुश्तफा शेख ( पैठण) अशी मिळून दुचाकी चोरुन दहेगाव (ता.शेवगाव) येथे ठेवल्याची कबुली दिली. तेथे जाऊन बँजाज प्लटीना ३, हिरोहोंडा स्पेंडर २ अशा ६ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
स.पो.नि. संदीप पाटील, स.फौ.सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डीले, संतोष लोंढे, मच्छिंद्र बर्डे, रणजित जाधव, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सागर सुलाने, संदीप दरंदले, मेघराज कोल्हे, चालक पोकाँ सचिन कोळेकर आदींच्या पथकाचा या कारवाई सहभाग होता.
0 Comments