Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात आता ११६ उमेदवार रिंगणातअर्ज माघारीच्या अंतिम दिनी ६६ उमेदवारांची माघार
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर - विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसानंतर बारा मतदारसंघात ११६ उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आता बाराही मतदारसंघातील निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. आज अखेरच्या दिवशी ६६ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे.

            अर्ज माघारीनंतर विविध मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे-
        २१६-अकोले (अ.ज) विधानसभा मतदारसंघ गणेश काशिनाथ मधे, सौ. शकुंतला भाऊसाहेब धराडे या २ अपक्ष उमेदवारांनी विहित मुदतीत माघार घेतली. त्यामुळे रिंगणात आता केवळ ४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

             डॉ.किरण यमाजी लहामटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- घड्याळ), पिचड वैभव मधुकरराव (भारतीय जनता पार्टी - कमळ), दीपक यशवंत पथवे (वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलींडर), घाणे भिवा रामा (अपक्ष- ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी),

            २१७- संगमनेर विधानसभा मतदारसंघ - सूर्यभान बाबूराव गोरे (बसपा), शोभा संजय फड (अपक्ष), सचिन मारूती शिंदे (अपक्ष) या तीन उमेदवारांनी माघार घेतली.

    निवडणुकीच्या रिंगणात आता ०८ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.    थोरात विजय उर्फ बाळासाहेब (इंडियन नॅशनल कॉंग्रेस), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना), शरद ज्ञानदेव गोर्डे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित बहुजन आघाडी), संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी), अविनाश हौशीराम भोर (अपक्ष), कालीराम बहिरु पोपळघट (अपक्ष), बापू पाराजी रणधीर (अपक्ष).

            २१८-शिर्डी मतदारसंघ - अल्ताफ इब्राहिम शेख (अपक्ष), राजेंद्र सखाराम पठारे (अपक्ष), डॉ. शेखर भास्करराव बोऱ्हाडे (अपक्ष) या तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता विधानसभेसाठी पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

            जगताप शिमोन ठकाजी (बहुजन समाज पार्टी- हत्ती), थोरात सुरेश जगन्नाथ (इंडियन नॅशनल काँग्रेस- हात), विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव (भारतीय जनता पार्टी-कमळ), कोळगे विशाल बबन (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलींडर), वाघ विश्वनाथ पांडुरंग (अपक्ष- ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी ).

            २१९-कोपरगाव मतदारसंघ - या मतदारसंघात दिलीपराव मारुतीराव तिडके, लोंढे शरद लक्ष्मण, आढाव नारायण माधवराव, आभाळे नानासाहेब मुरलीधर, आव्हाड प्रभाकर सिताराम, खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई, आगवणे ज्ञानदेव देवराम, टेके रावसाहेब चांगदेव  या आठ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १४ उमेदवार राहिले आहेत.

            आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), कोल्हे स्नेहलता बिपीनदादा (भारतीय जनता पार्टीं), माधव सखाराम ‍त्रिभुवन (बहुजन समाजपार्टी), कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ), कोल्हे शितल दिगंबर (हिंदुस्थान जनता पार्टी ), अशोक विजय गायकवाड (अपक्ष ), अहिरे मगन पांडुरंग (अपक्ष), उकिरडे सुदाम पंढरीनाथ्‍ (अपक्ष), काळे अशोक नामदेव (अपक्ष), परजणे राजेश सखाहरी (अपक्ष), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), वहाडणे विजय सूर्यभान (अपक्ष), शाह अलिम छोटु (अपक्ष),  साळुंके दीपक गणपतराव  (अपक्ष)

            २२०- श्रीरामपूर (अ.जा.) मतदारसंघ - श्रीरामपूर मतदारसंघातून डॉ. चेतन सदाशिव लोखंडे, सुरेंद्र बबन थोरात, मंदाबाई भाऊसाहेब कांबळे, योगेश रविंद्र जाधव, डोळस रवी भाऊसाहेब, डोळस भाऊसाहेब कारभारी, ॲङ स्वप्नील रामचंद्र जाधव, सुभाष यादवराव तोरणे, प्रतापसिंग देवराम देवरे, सुधाकर आनंदा ससाणे, भागचंद अभिमान नवगिरे, अशोक राजाराम जगधने, अशोक निवृत्ती बागुल, चरण दादा त्रिभुवन, बागुल युवराज धनाजी, मिस्टर दादा शेलार, दिपक चरण चव्हाण, प्रणिती दिपक चव्हाण, भारत संपत तुपे, कडु शांतवन शेलार, खाजेकर विजय गोविंद या २१ अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ११ उमेदवार उरले आहेत.

            अॅड. अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पार्टी) कानडे लहू नाथा (भारतीय राष्ट्रीय काँगेस), पगारे भाऊसाहेब शंकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना), अशोकराव रामचंद्र आल्हाट-(जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), जाधव रामचंद्र नामदेव (अपक्ष), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर(अपक्ष),

बारा मतदारसंघात आता ११६ उमेदवार रिंगणात मतदारसंघ - नेवासा मतदारसंघात अजय अशोकराव कोळेकर (अपक्ष), अशोकराव नामदेव कोळेकर (अपक्ष), सुनीता शंकरराव गडाख (अपक्ष) या ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १७ उमेदवार शिल्लक आहेत.

            बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजपा- कमळ), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी- हत्ती), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया - पेन ड्राईव्ह), कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी - बॅटरी टॉर्च), मतकर शशिकांत भागवत (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलींडर), शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी- बॅट), गोल्हार रामनाथ गहिनीनाथ (अपक्ष- रोड रोलर), देशमुख विठ्ठल विष्णु (अपक्ष- कपाट), भाऊसाहेब शिवराम जगदाळे (अपक्ष - क्रेन), मच्छिंद्र देवराव मुंगसे ( अपक्ष- किटली), राजुबाई कल्याण भोसले (अपक्ष- ट्रॅक्टर चालविणारा शेतरकरी), राजेंद्र एकनाथ निंबाळकर (अपक्ष- ऑटो रिक्षा), रामदास मारुती नजन (अपक्ष- कप आणि बशी), सौ.लक्ष्मी तुकाराम गडाख (अपक्ष- प्रेशर कुकर), विशाल वसंतराव गडाख (अपक्ष- फलंदाज), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष- दूरदर्शन),

         २२२-शेवगाव मतदारसंघ - शेवगाव मतदारसंघात हर्षदा विद्याधर काकडे, अमोल अशोक गर्जे, किसन महादेव आव्हाड, प्रा. सुनिल मोहनराव पाखरे, नीलेश बाबासाहेब ढाकणे, बाबासाहेब सुखदेव ढाकणे या अपक्षांसह ज्ञानेश्वर भास्कर जाधव (जय महाभारत पार्टी) अशा ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

            मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), ॲड. प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), धीरज मोतीलाल बताडे (राईट टु रिकॉल पार्टी), सुभाष त्रिंबक साबळे (बहुजन समाज पार्टी), विठठल पांडुरंग वाघ (अपक्ष), संदीप गोरक्षनाथ शेलार (अपक्ष), सदाशिव सटवाजी शिंदे (अपक्ष), कमरुद्दिन दगडु शेख (अपक्ष)

             २२३-राहुरी मतदारसंघ - राहुरी मतदारसंघात या तनपुरे अरूण बाबुराव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), तमनर विजय अशोक (वंचित बहुजन आघाडी), मोकाटे गोविंद खंडु (अपक्ष), पवार नामदेव बंडु (अपक्ष), साठे बाबासाहेब भगवान (अपक्ष) या पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने आता केवळ ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

            ‍कडिर्ले शिवाजी भानुदास (भाजपा-कमळ), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- घड्याळ), कर्डिले राजेंद्र दादासाहेब (अपक्ष- हेलीकॉप्टर), चंद्रकांत उर्फ संजय प्रभाकर संसारे (अपक्ष-बॅट), तनपुरे रावसाहेब राधुजी (अपक्ष- रोडरोलर), लांबे सुरेश उर्फ सुर्यभान दत्तात्रय‍ (अपक्ष- कप आणि बशी), विनायक रेवणनाथ कोरडे (अपक्ष- ऑटोरिक्षा).

            २२४-पारनेर मतदारसंघ - वसंत फुलाजी चेडे सुजीत वसंतराव पाटील आणि संदेश तुकाराम कार्ले या तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता पारनेर विधानसभा मतदारसंघात केवळ सहा उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

            औटी विजयराव भास्‍करराव (शिवसेना- धनुष्यबाण), नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी-घड्याळ), साठे जितेंद्र ममता (बहुजन समाज पार्टी- हत्ती), इंजि. डी.आर. शेंडगे (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलींडर), प्रसाद बापू खामकर (जनता पार्टी- नांगरधारी शेतकरी), भाऊसाहेब माधव खेडेकर (अपक्ष- कप आणि बशी)

            २२५-अहमदनगर शहर मतदारसंघ - अहमदनगर शहर मतदारसंघात श्रीराम जनार्दन येंडे आणि संजय एकनाथ कांबळे (दोघेही अपक्ष) यांनी माघार घेतली. या माघारीमुळे या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

            अनिलभैय्या रामकिसन राठोड (शिवसेना- धनुष्यबाण), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी- कणीस आणि वेळा), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा- हत्ती), संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- घड्याळ), संतोष नामदेव वाकळे (मनसे- रेल्वे इंजिन), किरण गुलाबराव काळे (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलिंडर), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम- पतंग), प्रतीक अरविंद बारसे (अपक्ष- शिवणयंत्र), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष- कप आणि बशी), सचिन बबनराव राठोड (अपक्ष- त्रिकोण), सुनिल सुरेश फुलसौंदर (अपक्ष- चावी),संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष- करनी),

           
            २२६-श्रीगोंदा मतदारसंघ - आज अखेरच्या दिवशी अनुराधा राजेंद्र नागवडे, दादा श्रीपती शिरवाळे, प्रविण मोहनराव मांडे, अण्णासाहेब सिताराम शेलार, नंदु श्रावण ससाणे या पाच अपक्षांनी माघार घेतल्याने ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

            घन:शाम प्रतापराव शेलार (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), पाचपुते बबनराव भिकाजी (भारतीय जनता पार्टी), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी), जठार बाळु अप्पा (पीझंटस अॅन्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया), टिळक गोपीनाथ घोस (संभाजी ब्रिगेड पार्टी), तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी), मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित बहुजन आघाडी), प्रमोद बाजीराव काळे, राजेंद्र निळकंठ नागवडे, सुनिल शिवाजी उदमले, हरिश्चंद्र पाटीलबुवा पाचपुते.

            २२७-कर्जत-जामखेड मतदारसंघ - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अशोक सर्जेराव पावणे, उत्‍तम फकिरा भोसले, किसन नामदेव सदाफुले, शहाजी राजेंद्र काकडे या ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार आता रिंगणात उरले आहेत.
 आप्‍पासाहेब नवनाथ पालवे (महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना), प्रा. राम शंकर शिंदे (भारतीय जनता पार्टी), रोहित पवार (नॅशनलिस्‍ट कॉंग्रेस पार्टी), भैलुमे शंकर मधुकर (बहुजन समाज पार्टी), अरूण हौसराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी), अपक्ष उमेदवार - गोविंद लक्ष्‍मण आंबेडकर, बजरंग मनोहर सरडे, अॅड. महारुद्र नरहरी नागरगोजे, राम रंगनाथ शिंदे, अॅड. पाटील सुमित कन्‍हैय्या, ज्ञानदेव नरहरी सुपेकर.             

Post a Comment

0 Comments