Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहर मतदारसंघातून दोघांची माघार; तिघांचे अर्ज अवैध, १२ उमेदवार रिंगणात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - २२५ अहमदनगर शहर विधानसभेसाठी १७ उमेदवारांनी २१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी सोमवार (दि.७) दाखल अर्जपैकी श्रीराम जनार्दन येंडे (अपक्ष) व संजय एकनाथ कांबळे (अपक्ष) या दोघांनी माघार घेतली तर छाननी मध्ये राजु हिरालाल गुजर, सुरेश किसनराव गायकवाड, सुभाष पांडुरंग शिंदे या तिघांचे नामनिर्देशनपत्र
अवैध ठरलेले आहेत. यामुळे नगर विधानसभा निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत.
अनिलभैय्या रामकिसन राठोड (शिवसेना, धनुष्यबाण), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी, कणीस आणि वीळा), श्रीपाद शंकर छिंदम (बहुजश समाज पार्टी, हत्ती), संग्राम अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस, घडयाळ), संतोष नामदेव वाकळे (मनसे, रेल्वे इंजिन), किरण गुलाबराव काळे (वंचित आघाडी, गँस सिलिंडर), मिर आसिफ सुलतान ( ए आय एम आय एम, पंतग), अपक्ष प्रतिक अरविंद बारसे (शिवनयंत्र), श्रीधर जाखुजी दरेकर (कप आणि बशी), सचिन बबनराव राठोड (त्रिकोण), सुनिल सुरेश फुलसौंदर (चावी), संदिप लक्ष्मण सकट (करनी) आदी उमेदवार नगर शहर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी रिंगणात आहेत.

Post a Comment

0 Comments