Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील तीन जणांना १ वर्षाकरिता अटक ; एलसीबी पथकाची कारवाई


  1. आँनलाईन न्यूज नेटवर्क
  2. नगर रिपोर्टर
  3. अहमदनगर - जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर व दकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कत्यांना आळा घालण्यासाठी तीन गुन्हेगारांविरुद्ध एक वर्षाकरिता अटक करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
  4. प्रविण उर्फ दीपक बबन लाटे ( वय ३०, रा.चिंचोली ता.राहुरी), रविराज जगन्नाथ भारती (वय २९, रा.कुंभारी ता.कोपरगाव), अरुण बाबासाहेब घुगे (वय २२, रा.दिपनगर केडगाव हाँटेल रंगोलीमागे,अ.नगर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
  5. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार, पो.नि. अनिल कटके, कोपरगावाचे पो.नि.काशिनाथ देशमुख, राहुरीचे स.पो.नि.शंकरसिंग राजपूत, नगर तालुक्याचे व एलसीबीचे स.फौ.मधुकर शिंदे, पोहेकाँ. संदीप घोडके, मोहन गाजरे, मनोज गासवी, बाळासाहेब मुळीक, पो.ना. रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे, विश्र्विस बेरड, संदीप पवार, विशाल दळवी, पो.काँ मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, किरण जाधव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अक्षय फलके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments