Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पालकमंत्री राम शिंदे यांच्या वाड्यावस्त्यांवर बैठका, प्रचार फेर्‍या

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी (दि.10) वाड्यावस्त्यांवर बैठका, प्रचार फेर्‍या घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रचार दौर्‍यात युवकांचे पक्ष प्रवेश घडवून त्यांनी विरोधी उमेदवार रोहीत पवार यांना धक्के देण्यास सुरूवात केली आहे.
गुरुवारी दिवसभरात राम शिंदे यांनी वडगाव तनपुरा, दूरगाव, धालवाडी, पिंपळवाडी, तळवाडी, बारडगाव दगडी, करमनवाडी, ताजू या कर्जत तालुक्यातील गावांमध्ये प्रचार फेर्‍या काढून वाडी-वस्त्यांवर बैठका घेत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी दूरगावातील अस्लम शेख, अफसर शेख, लालभाई शेख, इकबाल शेख, जाकीर शेख, सादिक शेख, रामभाऊ केंदळे, अण्णाभाऊ निंबाळकर यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत मध्ये प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments